वडगाव पूल अपघात प्रकरणी विशेष पोलीस पथक स्थापन

गौतमी पाटील यांच्या अडचणीत वाढ

वडगाव पूल अपघात प्रकरणी विशेष पोलीस पथक स्थापन

पुणे: प्रतिनिधी 

वडगाव पूल अपघात प्रकरणी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून या अपघाताच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. 

वडगाव पुलावर उभे असलेल्या रिक्षाला भरधाव वेगाने आलेल्या गौतमी पाटील यांच्या कारने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यामुळे रिक्षा तीन वेळा पलटी झाली.  रिक्षा चालक सामाजी विठ्ठल मरगळे यांना गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावरच टाकून कारमधील लोकांनी अपघात स्थळावरून पोबारा केला. त्यानंतर थोड्या वेळने अज्ञात व्यक्तीने क्रेनसह गौतमी पाटील यांची गाडी घटनास्थळावरून ओढून नेली. 

याप्रकरणी तपास योग्य पद्धतीने होत नाही. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दिले जात नाही, असे आरोप करीत मरगळे कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. त्यांना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पाठिंबा दिला. ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून योग्य कारवाई करण्याची सूचना केली आहे. या अपघाताच्या तपाससाठी विशेष पथक स्थापन करून अपघात स्थळ आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरील चित्रण तपासले जात आहे. 

हे पण वाचा  अखंड मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने गुणवंतांचा सन्मान

About The Author

Advertisement

Latest News

Advt