"उपमुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांच्या पाठबळाशिवाय 'छत्रपती' सुरू झाला नसता" – जाचक

सदस्यांनी ऊस छत्रपतीलाच द्यावा; जुन्या वैभवासाठी एकत्र यावं – अध्यक्षांची भावनिक साद

भवानीनगर, बारामती | प्रतिनिधी

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गळीतहंगाम उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याच्या मोलाच्या सहकार्यामुळेच सुरू होऊ शकला आहे. मात्र हा हंगाम यशस्वी करण्यासाठी सदस्यांनी आपला ऊस फक्त ‘छत्रपती’लाच द्यावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष जाचक यांनी केले.

छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर येथे बॉयलर प्रज्वलन कार्यक्रम दि. २ ऑक्टोबर रोजी पार पडला. संचालिका माधुरी राजपूरे व त्यांचे पती सागर राजपूरे, सुचिता सपकाळ व त्यांचे पती सचिन सपकाळ यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने बॉयलर प्रज्वलन झाले. या प्रसंगी अध्यक्ष जाचक यांनी भावनिक शब्दांत उपस्थितांना संबोधित केले.

  • कारखाना सुरू ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मोलाचे सहकार्य.

    हे पण वाचा  देहूमध्ये आमदार शेळकेंचा जनतेशी थेट संवाद

  • सदस्यांनी ऊस बाहेर न देता छत्रपतीलाच द्यावा – कारखान्याचे आवाहन.

  • १२ लाख मेट्रिक टन गाळप व ११.५% रिकव्हरीचे उद्दिष्ट.

  • ‘माझा कारखाना, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत एकजूट.

  • यंदा कामगारांना बोनस देण्याची घोषणा.

"छत्रपती म्हणजे माझ्यासाठी आई" – जाचक

जाचक म्हणाले, "छत्रपती कारखाना माझ्यासाठी आईसमान आहे. या कारखान्याच्या बॉयलर प्रज्वलनाचा कार्यक्रम माझ्या आई-वडिलांच्या हस्ते झाला, आणि तेव्हाच मी तिच्या पोटी होतो. त्यामुळे माझं या कारखान्याशी नातं केवळ व्यावसायिक नाही, तर भावनिकही आहे. यंदाचा हंगाम सुरू होणं हे उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठबळामुळे शक्य झालं. त्यांच्या सहकार्याने आणि सदस्यांच्या एकजुटीने आपण नक्कीच जुनं वैभव पुन्हा मिळवू."

गेल्या वर्षीचा तोटा, यंदा नवसंजीवनीची अपेक्षा

"गेल्या वर्षी ऊसाचा अपुरा पुरवठा झाल्याने कारखान्याला मोठा तोटा सहन करावा लागला. मात्र यंदा सर्व सदस्यांनी एकत्र येऊन आपला ऊस छत्रपतीला दिल्यास आपण निश्चितच १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट गाठू," असेही जाचक यांनी स्पष्ट केले.

नेत्यांचे आवाहन आणि सहभाग

या कार्यक्रमात माजी अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष कैलास गवडे, संचालक अशोक पाटील, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, मनथन कांबळे, अजित पाटील, डॉ. योगेश पाटील, अनिल काटे, तानाजी शिंदे, कार्यकारी संचालक अशोक जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रशांत काटे म्हणाले, "गेल्या हंगामात अनेक सदस्यांनी ऊस बाहेरील कारखान्यांना दिल्यामुळे छत्रपतीला मोठा फटका बसला. यंदा तसे होऊ नये यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागावे."

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन कामगार नेते युवराज रणवरे यांनी केले. यावेळी तानाजीराव थोरात, विशाल निंबाळकर, अशोक काळे, संतोष चव्हाण, रविंद्र ताकले, ताराचंद दराडे, रायते महाराज आदींनी मनोगते व्यक्त केली.

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

लोणावळा नगराध्यक्षपद अनुसूचित जातींसाठी राखीव; अशोक मानकर आघाडीवर इच्छुक लोणावळा नगराध्यक्षपद अनुसूचित जातींसाठी राखीव; अशोक मानकर आघाडीवर इच्छुक
वडगाव मावळ (प्रतिनिधी) – लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यंदा अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव ठरले असून, या पार्श्वभूमीवर सुशिक्षित आणि अनुभवी...
'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस'
वडगाव मावळ नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध
आता टिपू पठाण टोळीवर पोलिसांचा बडगा
कैद्यांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणि आमिष
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीची चार तास चौकशी

Advt