- राज्य
- आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्की तर चालकाला मारहाण
आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्की तर चालकाला मारहाण
आमदारांनी स्थानिक नागरिकाला मारहाण केल्याचा आरोप
On
पुणे: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बंडू खांदवे यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आली तर त्यांच्या चालकाला मारहाण करण्यात आली.
निवृत्त सेनाधिकाऱ्याच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात या दोघांची भेट झाली. कार्यक्रम संपल्यावर दोघांमध्ये वाद झाला. पठारे यांनी एका नागरिकाला मारहाण केल्याबद्दल खांदवे यांनी जाब विचारला. या वादाचे पर्यावसान धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले.
यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांना शांत केले. पठारे आणि खांदवे यांनी एकमेकांच्या विरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Tags:
About The Author
Latest News
09 Oct 2025 04:53:40
वडगाव मावळ (प्रतिनिधी) – लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यंदा अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव ठरले असून, या पार्श्वभूमीवर सुशिक्षित आणि अनुभवी...