नगराध्यक्षपदासाठी ॲड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांना उमेदवारी, १७ पैकी १४ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर

मोठा राजकीय धक्का : राष्ट्रवादी (शरद पवार गट) युवक तालुकाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

भास्करराव म्हाळसकर म्हणाले की, वडगाव नगरपंचायत निवडणूक भाजपा–शिवसेना महायुतीकडून लढविण्याचा निर्णय झाला असून शिवसेनेला प्रभाग १ मध्ये एक जागा देण्यात आली आहे. यावेळी उच्चशिक्षित व कार्यक्षम उमेदवार लोकांसमोर देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्षपदासाठी ॲड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांना उमेदवारी, १७ पैकी १४ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर

वडगाव मावळ/ प्रतिनिधी

वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीने उमेदवारी जाहीर करून राजकीय वातावरण तापवले आहे. नगराध्यक्ष पदासाठी ॲड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करताना १७ पैकी १४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत  घोषणा केली.

या परिषदेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबूराव वायकर, ज्येष्ठ नेते अविनाश बवरे, सुभाषराव जाधव, अरुण चव्हाण, चंद्रशेखर भोसले, दामोदर भंडारी, तुकाराम काटे, विजय जाधव, मिलिंद चव्हाण, बंडोपंत भेगडे, संभाजी म्हाळसकर, नारायण ढोरे, सुधाकर ढोरे, किरण भिलारे, बाळासाहेब कुडे, नाथा घुले, रवींद्र म्हाळसकर, भूषण मुधा, कल्पेश भोंडवे व प्रसाद पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 युतीने ‘उच्चशिक्षित आणि कार्यक्षम’ उमेदवार देण्यावर भर

हे पण वाचा  काँग्रेसने पुढे केला शरद पवार यांच्यासमोर मैत्रीचा हात

भास्करराव म्हाळसकर म्हणाले की, वडगाव नगरपंचायत निवडणूक भाजपा–शिवसेना महायुतीकडून लढविण्याचा निर्णय झाला असून शिवसेनेला प्रभाग १ मध्ये एक जागा देण्यात आली आहे. यावेळी उच्चशिक्षित व कार्यक्षम उमेदवार लोकांसमोर देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपा–शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे :

नगराध्यक्षपद 
ॲड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर

प्रभाग निहाय उमेदवार

1. रेणुका दिपक कोकाटे ,2. दिनेश गोविंद ढोरे,3. रोहित मंगेश धडवले

4. पुजा अतिश ढोरे, 5. अश्विनी योगेश म्हाळसकर ,6. शेखर वसंत वहिले

7. दिपक नारायण भालेराव,8. सुजाता गणेश भेगडे,9. किरण रघुनाथ म्हाळसकर

10. राजेंद्र हनुमंत म्हाळसकर,11. दिपाली शरद मोरे 12. अनंता बाळासाहेब कुडे, 13. राणी संतोष म्हाळसकर ,14. अर्चना संतोष म्हाळसकर

 मोठा राजकीय धक्का : राष्ट्रवादी (शरद पवार गट) युवक तालुकाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल वहिले आणि वडगावच्या माजी उपनगराध्यक्षा पूजा वहिले यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

विशाल वहिले हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपसरपंच पदावर कार्यरत होते, तर पूजा वहिले यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला होता. आज महायुतीमध्ये प्रवेश करून त्यांनी स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे निर्माण केली आहेत.

भाजप–शिवसेना युतीच्या उमेदवारी जाहीर कार्यक्रमासोबत झालेला हा प्रवेश स्थानिक राजकारणाचा ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार  लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार 
पुणे: प्रतिनिधी  लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...
भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'
संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा
नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम
भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले

Advt