- राज्य
- शंकरराव गडाख यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
शंकरराव गडाख यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून लढवणार निवडणुका
अहिल्यानगर: प्रतिनिधी
पक्ष फुटीच्या वेळेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. आपल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढविणार आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात जलसंपदा मंत्री असलेले शंकरराव गडाख हे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रभावशाली नेते मानले जातात. त्यावेळी ते नेवासा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत होते. मागील विधानसभा निवडणूक त्यांनी मशाल या चिन्हावर लढली. त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात फूट पडल्यानंतरही गडाख हे ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे होते.
मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडाख यांनी शिवसेना ठाकरे गट सोडून पुन्हा आपल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो.

.jpg)