- राज्य
- प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत फुटणार अँड. मृणाल म्हाळसकर यांच्या प्रचाराचा नारळ
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत फुटणार अँड. मृणाल म्हाळसकर यांच्या प्रचाराचा नारळ
वडगाव नगरपंचायत निवडणूक २०२५ : भाजप महायुतीचा भव्य प्रचार शुभारंभ
वडगाव मावळ/| प्रतिनिधी
वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी — शिवसेना — आर.पी.आय महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार अँड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांच्या प्रचार मोहिमेचा दिमाखदार शुभारंभ येत्या शनिवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात होणार आहे.
या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण विशेष उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने प्रचाराचा नारळ फोडून निवडणूक प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी दिली.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह उसळला*
प्रचार शुभारंभासाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला वडगाव परिसरातील महायुतीचे सर्व नेते, प्रभागप्रमुख, महिला व युवा मोर्चेचे कार्यकर्ते, तसेच सर्व बूथ प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या निमित्ताने भाजपचे शक्ती प्रदर्शन होणार असून, निवडणूक वातावरणात उत्साहाची नवी लाट निर्माण झाली आहे.
अँड. मृणाल म्हाळसकर : युवा, सक्षम व सक्रिय नेतृत्व
अँड. मृणाल म्हाळसकर या शिक्षित, कायदेविषयक पार्श्वभूमी असलेल्या, विकासाभिमुख आणि स्वच्छ प्रशासनाची प्रतिमा असलेल्या युवा नेत्या आहेत.प्रचाराच्या उद्घाटनानंतर शहरातील प्रमुख भागात नागरिक संवाद उपक्रम राबविण्यात येतील.
प्रचाराला नवी गती ; राजकीय समीकरणात बदल*
वडगावमध्ये निवडणूक तापल्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचा हा शो ऑफ स्ट्रेंथ राजकीय समीकरणांमध्ये बदल घडवू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.पुढील काही दिवसांत बूथस्तरावर बैठका, घरोघरी भेट मोहिमा आणि लहान सभांना गती मिळण्याची चिन्हे आहेत.
About The Author

2.jpg)