देहूमध्ये आमदार शेळकेंचा जनतेशी थेट संवाद

जनसंवाद – विकासाच्या नव्या दिशा दाखविणारा उपक्रम”

देहूमध्ये आमदार शेळकेंचा जनतेशी थेट संवाद

वडगाव मावळ/ प्रतिनिधी 
मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र देहू येथील सरस्वती मंगल कार्यालय, गाथा मंदिर रोड येथे आयोजित ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. जनतेच्या अपेक्षा, प्रश्न आणि गरजा समजून घेऊन त्यांचे निराकरण शासनस्तरावर व्हावे, यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत, असा निर्धार आमदार शेळके यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना लिखित स्वरूपात सादर केल्या तसेच आमदार शेळके यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत आपल्या भावना मांडल्या. सामाजिक, शैक्षणिक, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि नागरिक सुविधा या क्षेत्रातील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

आमदार शेळके यांनी सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि “जनतेच्या अडचणींचे तातडीने निराकरण होण्यासाठी सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून कार्यवाही करण्यात येईल,” असे आश्वासन दिले.त्यांनी पुढे सांगितले की, “शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे, आणि आम्ही ती प्रामाणिकपणे पार पाडत आहोत.”

या कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, जनतेच्या प्रश्नांना थेट ऐकून घेणारा आणि तत्परतेने प्रतिसाद देणारा ‘जनसंवाद’ हा उपक्रम विकासाच्या नव्या दिशा दाखविणारा ठरत आहे.या जनसंवाद कार्यक्रमाला देहू येथील सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते 

हे पण वाचा  "उपमुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांच्या पाठबळाशिवाय 'छत्रपती' सुरू झाला नसता" – जाचक

जनतेशी थेट संवाद साधत समस्यांचे निराकरण करण्याची आमदार सुनील शेळके यांची तळमळ आणि सक्रियता यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

Advt