- राज्य
- पुण्याचा आयुक्त म्हणून काम करणे सन्मानजनक: अमितेश कुमार
पुण्याचा आयुक्त म्हणून काम करणे सन्मानजनक: अमितेश कुमार
वाढदिवसानिमित्त नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे अभिष्टचिंतन
पुणे : प्रतिनिधी
जागतिक शहराचा नावलौकिक असलेले व सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहराचा पोलीस आयुक्त म्हणून कारभार करणे आनंददायी व सन्मानजनक असल्याची भावना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात व्यक्त केली.
शहरातील प्रभावी कामगिरीबद्दल पुणे शहरातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांकडून व माजी लोकप्रतिनिधींकडून वाढदिवसानिमित्त अमितेश कुमार यांचा त्यांचे दालनात विशेष सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुणे शहराची ओळख असलेले महात्मा फुले यांची पगडी, उपरणे व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी चे अध्यक्ष राहुल डंबाळे, शिवसेनेचे उपनेते अजय भोसले, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेवक आनंद अलकुंटे, माजी नगरसेवक ॲड. गफूर पठाण, माजी नगरसेवक अय्युब शेख, माजी नगरसेवक हिमाली कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, माजी नगरसेवक रफिक शेख, सामाजिक कार्यकर्ते आबिद सय्यद, जास्मिन शेख, रेश्मा खान, यांचेसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.