- राज्य
- 'अमेरिकेला उचलावी लागणार भारताचीच तळी'
'अमेरिकेला उचलावी लागणार भारताचीच तळी'
विख्यात भविष्यवेत्तें विनोद ठक्कर यांचा होरा
पुणे: प्रतिनिधी
सध्याच्या काळात टॅरीफच्या माध्यमातून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असले तरी देखील लवकरच अमेरिकेला भारताचीच तळी उचलण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असा दावा ज्येष्ठ भविष्यवेत्ते विनोद ठक्कर यांनी व्यक्त केला आहे.
ठक्कर हे अंत:प्रेरणा आणि अध्यात्मिक पार्श्वभूमीच्या आधारे विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटना, निवडणुका व क्रीडा क्षेत्रातील घडामोडींबद्दल भविष्यकथन करत असतात. त्यांना समाज माध्यमांवर मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत त्यांनी मतमोजणीपूर्वी पंधरा दिवस राष्ट्रीय लोकशाही आघाडीला किमान 190 जागा मिळतील आणि विरोधी आघाडी 55 पेक्षा पुढे जाणार नाही, असा अंदाज व्यक्त केला होता. मतमोजणीनतर तो योग्य ठरला आहे. मात्र, नितीश कुमार हे फार काळ बिहारच्या मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत. भारतीय जनता पक्षाचा नेता मुख्यमंत्री पदावर येईल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले आहे.
कर्नाटक मध्ये मोठी राजकीय घडामोडी घडवून सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री पदाचा त्याग करतील, असाही त्यांचा होरा आहे. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतीय संघ जिंकेल, असेही त्यांनी आधीच सांगितले होते. तो अंदाजही योग्य ठरला आहे.
डॉलरचे मह कमी होणार
अमेरिका फेब्रुवारीपासून भारताबाबत असलेली कठोर भूमिका सौम्य करून आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे महत्त्व मान्य करेल, असेही ठक्कर यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेचे महत्त्व घटत जाईल आणि सन 2027 पासून अमेरिकेन डॉलरचे आंतरराष्ट्रीय अर्थकारणातील प्राबल्य कमी होईल, अशी महत्त्वपूर्ण शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

1.jpg)