- राज्य
- 'सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना लोकप्रतिनिधींचे समर्थन'
'सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना लोकप्रतिनिधींचे समर्थन'
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांचा खळबळजनक आरोप
बीड: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचे लोकप्रतिनिधींकडून उघडपणे समर्थन केले जात असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.
वाल्मीक कराड याची मुक्तता करण्यासाठी निधी उभारण्याचे काम केले जात आहे. दसऱ्याच्या आसपास वाल्मीक कराड याचे स्कॅनर आणि बॅनर मोबाईलवर फिरत होते. त्यामार्फत पैसे गोळा केले जात आहेत. आपण याबाबतची कल्पना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिली आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सुरुवातीपासूनच वाल्मीक कराड याचे समर्थन करत असल्याचे उघडपणे दिसून आले आहे. त्यांच्या विरोधात न बोलणे हे समर्थन करण्यासारखेच आहे, असेही देशमुख यांनी नमूद केले आहे. आरोपींना पाठीशी घालणारा राजकारण्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे प्रकार सुरूच राहतील, असेही देशमुख म्हणाले.