- राज्य
- 'सध्याचा सामाजिक विसंवाद हे शरद पवार यांचे पाप'
'सध्याचा सामाजिक विसंवाद हे शरद पवार यांचे पाप'
राधाकृष्ण विखे पाटील यांची कडवट टीका
बुलढाणा: प्रतिनिधी
सध्याच्या काळात समाजात माजलेली दुही, मी संवाद आणि संघर्ष या पापाचे धनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हेच असल्याचा आरोप जेष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. पवार यांनी सन १९९४ मध्ये आरक्षणाच्या लाभार्थींमध्ये मराठा समाजाचा समावेश केला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, असेही ते म्हणाले.
इतर मागास प्रवर्गाला आरक्षण देताना त्याला मराठा समाजाने कधीही आक्षेप घेतला नाही. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे. यांच्या या पापाबद्दल पवार यांना जाब विचारला पाहिजे, असेही विखे पाटील म्हणाले. सध्याच्या काळात हैदराबाद गॅझेटियरनुसार आरक्षण देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
संजय राऊत हा बांग देणारा कोंबडा
संजय राऊत या व्यक्तीला आपण काडीचीही किंमत देत नाही. त्यांच्या पक्षाने त्यांना सकाळची बांग नेण्यासाठी ठेवले आहे. सरकारने संपर्क शेतकऱ्यांना भरीव पॅकेज दिले आहे. सामना हे वृत्तपत्र कोणी वाचत नाही. त्यामुळे त्यात काय म्हटले आहे याबाबत फार विचार करण्याचे कारण नाही, अशा शब्दात विखे पाटील यांनी राऊत यांची खिल्ली उडवली.