- राज्य
- घड्याळ चिन्हावर लढणार वडगावची निवडणूक; राष्ट्रवादीने जाहीर केली प्राथमिक यादी
घड्याळ चिन्हावर लढणार वडगावची निवडणूक; राष्ट्रवादीने जाहीर केली प्राथमिक यादी
वडगाव मावळ /प्रतिनिधी
वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली अधिकृत उमेदवार यादी जाहीर करत राजकीय समीकरणात चुरस निर्माण केली आहे. ही घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केली.
यावेळी जेष्ठ नेते गणेशअप्पा ढोरे, सुनिल चव्हाण, मंगेश ढोरे, तुकाराम ढोरे, बाळासाहेब ढोरे, राजेंद्र चव्हाण,शहराध्यक्ष प्रविण ढोरे, दत्तात्रय कुडे चंद्रकांत ढोरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाच्या या घोषणेने वडगावात राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकीतील लढाई अधिक तीव्र होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
🔹 स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांत उत्साह
पहिली यादी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघटनात्मक बैठका, युवक व महिला मोर्चांच्या सक्रियतेला या यादीने चालना मिळाली असून, पक्ष एकत्रितपणे निवडणुकीत उतरल्याचे चित्र दिसत आहे.
🔹 घड्याळ चिन्हावर लढणार निवडणूक
राष्ट्रवादी काँग्रेसने यंदाची निवडणूक अधिकृतपणे घड्याळ या चिन्हावर लढवण्याची घोषणा केली आहे. स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, गटारव्यवस्था, स्वच्छता, व्यावसायिकांना सुविधा अशा मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडत विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.
🔹 पक्षीय गटबाजीला पूर्णविराम?
मागील काही दिवसांपासून उमेदवार निवडीवरून दिसत असलेल्या अंतर्गत चर्चांना पहिली यादी जाहीर होताच तात्पुरता पूर्णविराम मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे. प्रभागनिहाय दिलेली यादी सर्व गटांचा समतोल साधणारी असल्याने स्थानिक पातळीवर पक्ष संघटितपणे पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
प्रभागनिहाय घोषित प्राथमिक उमेदवार :
प्रभाग १ : पुनम विकी भोसले, मिरा चंद्रकांत पारधी
प्रभाग २ : प्रवीण विठ्ठल ढोरे
प्रभाग ३ : भाऊसाहेब तुकाराम ढोरे
प्रभाग ४: सुनिता राहुल ढोरे
प्रभाग ५ : वैशाली पंढरीनाथ ढोरे
प्रभाग ६ : मयुर प्रकाश ढोरे
प्रभाग ७ : अजय भवार
प्रभाग ८ : माया चव्हाण
प्रभाग १० : आकांक्षा वाघवले
प्रभाग ११ : सुनील गणेश ढोरे
прभाग १२ : गणेश सोपान म्हाळसकर
प्रभाग १३ : अजय बाळासाहेब म्हाळसकर
प्रभाग १४ : वैशाली गौतम सोनवणे
प्रभाग १५ : राजेंद्र विठ्ठल कुडे
प्रभाग १६ : मिनाक्षी गणेश ढोरे
प्रभाग १७ : अर्चना ज्ञानेश्वर ढोरे
🔹 उमेदवार उद्या अर्ज दाखल करणार
जाहीर केलेल्या सर्व उमेदवारांचा उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठा जल्लोष, जनसंपर्क मोर्चा आणि शक्तीप्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पक्षाने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे.
About The Author

