'... तर राज्यभरात होऊ देणार नाही गौतमीचे कार्यक्रम'

नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या विरोधात गनिमी कावा संघटनेची निदर्शने

'... तर राज्यभरात होऊ देणार नाही गौतमीचे कार्यक्रम'

पुणे: प्रतिनिधी

नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कारने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाकडे दुर्लक्ष करण्याच्या निषेधार्थ गनिमी कावा संघटनेच्या वतीने बालगंधर्व चौकात निदर्शने करण्यात आली. संबंधित रिक्षाचलकाच्या कुटुंबीयांना गौतमी पाटील यांनी मदत न केल्यास त्यांचे कार्यक्रम राज्यभरात होऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

गौतमी पाटील या कलाकार आहेत. त्यांच्या कारणे धडक दिल्यामुळे रिक्षा चालक सामाजी मरगळे गंभीर जखमी आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणे आणि त्यांच्यावरील उपचारांसाठी मदत करणे हे गौतमी पाटील यांचे कर्तव्य आहे. मात्र, अद्याप त्यांनी हे पार पाडलेले नाही. गनिमी कावा संघटना याचा तीव्र निषेध करत आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

या निदर्शनांमध्ये जखमी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांच्या कन्या अपर्णा यादेखील सहभागी झाल्या. त्यांनी गौतमी पाटील यांच्या विरोधात  न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. पोलीस गौतमी यांच्यावर कारवाई करणार नाहीत. वास्तविक आमच्याशी संपर्क साधणे, आम्हाला मदत करणे हे गौतमी यांचे नैतिक कर्तव्य होते. ते त्यांनी पार पाडले नाही, असे अपर्णा म्हणाल्या. 

हे पण वाचा   वांगचुक यांच्या अटकेच्या विरोधात लडाखी विद्यार्थी रस्त्यावर

तीस सप्टेंबरच्या पहाटे गौतमी पाटील यांच्या कारने वडगाव पुलावर उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचालक आणि प्रवासी जखमी झाले. पाटील यांच्या गाडीचा चालक अपघात स्थळावरून पळून गेला. काही वेळानंतर पाटील यांची गाडी देखील ट्रेनने ओढून नेण्यात आली. 

 

About The Author

Advertisement

Latest News

Advt