प्रशांत दामले यांचा 13333 वा नाट्यप्रयोग 16 नोव्हेंबरला

नाट्यरसिकांनी उपस्थित राहण्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

प्रशांत दामले यांचा 13333 वा नाट्यप्रयोग 16 नोव्हेंबरला

पुणे: प्रतिनिधी

प्रशांत दामले हे अत्यंत लोकप्रिय अभिनेते असून 16 नोव्हेंबरला त्यांचा विक्रमी 13333 वा नाट्यप्रयोग सादर होईल. त्यासाठी आपली तारीख राखून ठेवा, असे आवाहन ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान आयोजित कोथरूड नवरात्र महोत्सवात "शिकायला गेलो एक" ह्या अफलातून विनोदी नाटकाच्या मोफत प्रयोगाच्या वेळी प्रशांत दामले यांचा पुणेरी पगडी, शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी रंगमंचावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल भेलके, श्वेताली भेलके, सांस्कृतिक महोत्सवाचे संयोजक उमेश भेलके , अक्षदा भेलके, कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, कोथरूड मध्यचे भाजपा मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, क्रिएटिव्ह फौंडेशनचे विश्वस्त प्रतीक खर्डेकर, कल्याणी खर्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

हे पण वाचा  रोहिणी खडसे यांची अमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी

क्रिएटिव्ह फाउंडेशनचे कार्य गौरवास्पद असून मी संदीप खर्डेकर यांची वाटचाल व त्यांचे कार्य गेली 35 वर्षे बघत आली आहे असे माधुरी मिसाळ म्हणाल्या. नवरात्रीतच नव्हे तर कायमच स्त्रीशक्तीचा सन्मान केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या सामाजिक कार्याबद्दल एक संवेदनशील नेतृत्व म्हणून त्यांचा विशाल भेलके, उमेश भेलके व प्रतीक खर्डेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व म्हणून  माधुरी मिसाळ यांचा मंजुश्री खर्डेकर, श्वेताली भेलके व अक्षदा भेलके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने श्रमदान मारुती मंडळ ग्रंथालयास अजय कोंढरे व मोहनीश सावंत यांना अकरा हजाराची मदत देण्यात आली. तसेच कुंबरे गार्डन गणेशोत्सव मंडळाचे ऋषिकेश कुंबरे व स्वर्गीय रखमाबाई ताडगे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल ताडगे यांना स्पीकर सेट भेट देण्यात आली.

बाहेर मुसळधार पाऊस आणि तुडुंब भरलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात " शिकायला गेलो एक " च्या प्रयोगात हास्याचा धबधबा कोसळत होता असे संयोजक संदीप खर्डेकर म्हणाले. अश्या पावसात देखील कोथरूडकर सर्व कार्यक्रमांना गर्दी करत आहेत यावरूनच दर्दी प्रेक्षकांची पारख होते असेही खर्डेकर म्हणाले. यापुढील काळात अधिक व्यापक स्वरूपात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर, श्वेताली भेलके व अक्षदा भेलके यांनी जाहीर केले.

About The Author

Advertisement

Latest News

लोणावळा नगराध्यक्षपद अनुसूचित जातींसाठी राखीव; अशोक मानकर आघाडीवर इच्छुक लोणावळा नगराध्यक्षपद अनुसूचित जातींसाठी राखीव; अशोक मानकर आघाडीवर इच्छुक
वडगाव मावळ (प्रतिनिधी) – लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यंदा अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव ठरले असून, या पार्श्वभूमीवर सुशिक्षित आणि अनुभवी...
'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस'
वडगाव मावळ नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध
आता टिपू पठाण टोळीवर पोलिसांचा बडगा
कैद्यांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणि आमिष
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीची चार तास चौकशी

Advt