मलकापूर नगरपालिका निवडणूक: नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट
नगरसेवक पदासाठी ३५ उमेदवार रिंगणात
कराड-मलकापूर, प्रतिनिधी
मलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतरचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत रंगणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्यन सविनय कांबळे, शिवसेना शिंदे गटाचे अक्षय संदीप मोहिते आणि भारतीय जनता पार्टीचे तेजस शेखर सोनवले यांच्यात सरळ मुकाबला होणार आहे.
नगरसेवकांच्या २२ जागांपैकी पाच जागांवर विरोधकांचे अर्ज अवैध ठरल्याने भाजपचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरीत १७ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात राहणार असून प्रभागनिहाय लढती पुढीलप्रमाणे असतील:
प्रभागनिहाय उमेदवारांची यादी..
प्रभाग क्रमांक १ अ
कांचन सारंग लोहार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
अश्विनी मोहन शिंगाडे (भाजप)
रब्बाना अझरुद्दीन शेख (शिवसेना)
प्रभाग क्रमांक १ ब
नितीन उर्फ नारायण विष्णुपंत काशीद पाटील (शिवसेना उद्धव ठाकरे गट)
प्रशांत शिवाजी चांदे (भाजप)
प्रभाग क्रमांक २ अ
गीतांजली शहाजी पाटील (भाजप)
विजया प्रताप सूर्यवंशी (अपक्ष)
प्रभाग क्रमांक २ ब
विक्रम अशोक चव्हाण (भाजप)
भीमाशंकर इराप्पा माऊर (अपक्ष)
प्रभाग क्रमांक ३ अ
हणमंत कृष्णत पुजारी (राष्ट्रीय काँग्रेस)
धनंजय शामराव येडगे (भाजप)
प्रभाग क्रमांक ४ ब
कल्पना नारायण रैनाक (भाजप)
आनंदी मोहन शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
प्रभाग क्रमांक ५ अ
मृणालिनी अमर इंगवले (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
शुभांगी दिनकर माळी (भाजप)
प्रभाग क्रमांक ५ ब
राजेंद्र प्रल्हाद यादव (भाजप)
दादासो बाबू शिंगण (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
प्रभाग क्रमांक ६ अ
काजल अक्षय माने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
सीमा बाळासो सातपुते (भाजप)
प्रभाग क्रमांक ६ ब
संदीप बबन मुठ्ठल (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
सुरज शंकर शेवाळे (भाजप)
प्रभाग क्रमांक ८ अ
स्वाती समीर तुपे (भाजप)
छाया हणमंत भोसले (רाष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
प्रभाग क्रमांक ८ ब
सागर हणमंत जाधव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
शरद उमाकांत पवार (भाजप)
अक्षय दादासो पाटणकर (शिवसेना)
प्रभाग क्रमांक १० अ
प्रशांत विजय पोतदार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
प्रमोद माणिकराव शिंदे (भाजप)
प्रभाग क्रमांक १० ब
स्वाती रणजीत थोरात (भाजप)
स्नेहल सत्यवान पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
प्रभाग क्रमांक ११ अ
राजश्री नितीन जगताप (भाजप)
वैशाली वैभव पाटील (अपक्ष)
छाया अर्जुन येडगे (अपक्ष)
प्रभाग क्रमांक ११ ब
अनुराज शंकर थोरात (अपक्ष)
मनोहर भास्करराव शिंदे (भाजप)
बिनविरोध निवडून आलेले भाजप उमेदवार...
प्रभाग क्रमांक ३ ब – रंजना अशोक पाचुंदकर
प्रभाग क्रमांक ४ ब – सुनील प्रल्हाद खैरे
प्रभाग क्रमांक ७ अ – सुनिता राहुल पोळ
प्रभाग क्रमांक ७ ब – हणमंत निवृत्ती जाधव
प्रभाग क्रमांक ९ अ – ज्योत्स्ना अभिजीत शिंदे
मलकापूर निवडणुकीतील तिढा, स्थानिक आघाड्या आणि पक्षनिहाय समीकरणांमुळे या निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे.
000
