- राज्य
- छत्रपती शिवाजी महाराज हे १७ व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरसेनापती-प्रा. नितीन बानुगडे-पाटील
छत्रपती शिवाजी महाराज हे १७ व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरसेनापती-प्रा. नितीन बानुगडे-पाटील
मावळ विचार मंच आयोजित रौप्यमहोत्सवी सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन
वडगाव मावळ प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज हे १७ व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरसेनापती होते, महाराजांनी त्यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ध्येय, जिज्ञासावृतीने व नियोजन करून केली. त्यामुळे ते यशस्वी झाले. म्हणूनच आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर योग्य नियोजन केले पाहिजे.असे मत प्रसिद्ध वक्ते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केले.
वडगाव मावळ येथील मावळ विचार मंच आयोजित रौप्यमहोत्सवी सरस्वती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना बानगुडे-पाटील बोलत होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पोटोबा देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे,भाजपाचे सरचिटणीस रामदास गाडे,रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक विलास काळोखे व्याख्यानमालेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉक्टर रवींद्र आचार्य,यावर्षीचे सरस्वती व्याख्यानमालेचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष अजित देशपांडे, उपाध्यक्ष दामोदर भंडारी, कार्यक्रम प्रमुख धनश्री भोंडवे, आरती राऊत, सचिव गिरीश गुजरानी, खजिनदार संतोष भालेराव, अतुल म्हाळसकर आदी उपस्थित होते.
प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, छत्रपती शिवरायांना वडील छत्रपती शहाजीराजे यांनी वयाच्या १२ व्या वर्षी भगवा ध्वज दिला. महाराजांनी पहिली सहकारी संस्था उभारली, नाव स्वराज्य होते. स्वराज्य उभारताना महाराजांनी नॅशनल कॅरॅक्टर तयार केली. महाराजांनी तयार केलेले मंत्रिमंडळ, न्यायव्यवस्था, गुप्तहेर यंत्रणा, व्यवस्थापन हे आजही मार्गदर्शक आहेत. स्वराज्य स्थापन करताना महाराजांना मिळालेले मावळे हे स्वराज्यासाठी ध्येयवेडे होते.छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र आजच्या तरुण पिढीला आदर्शवत आहे.
बुद्धीच्या जोरावर काही लढाया जिंकायच्या असतात
सर्व लढाया तलवारीने जिंकता येत नाहीत. बुद्धीच्या जोरावर काही लढाया जिंकायच्या असतात. कोणतीही गोष्ट करताना एकाच पर्यायावर अवलंबून राहू नका. अनेक पर्याय निर्माण केले पाहिजेत. जे स्वतःच्या पायावर उभे राहतात ते कधीही ढासळत नाहीत, असेही बानगुडे पाटील म्हणाले.
यावेळी तळेगावातील प्रसिद्ध उद्योजक विलास काळोखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.सपना म्हाळसकर यांनी मानपत्राचे वाचन केले.अनता कुडे यांनी सूत्रसंचालन केले.कुलदिप ढोरे यांनी आभार मानले.
About The Author
