मावळमध्ये भीषण अपघात;आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसला

दोन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा जखमी; संतापलेल्या ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन

आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

मावळमध्ये भीषण अपघात;आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसला

वडगाव मावळ/ सतिश गाडे 

मावळ तालुक्यातील कामशेत परिसरात मंगळवारी सकाळी ६:३० सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघात इतका भीषण होता की वारकऱ्यांना दूरवर फेकले गेले. काही क्षणातच भक्तिगीतांचा गजर शांत झाला आणि सर्वत्र आक्रोश व मदतीचे आवाज घुमू लागले.

जखमींना तातडीने कामशेत व लोणावळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

हे पण वाचा  मुस्लिम समाजामध्ये दादांच्या राष्ट्रवादीबाबत नाराजी

दरम्यान, या अपघातानंतर परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर उतरून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

ग्रामस्थांनी मागणी केली आहे की,

> “या भागात सातत्याने अपघात होत आहेत. वारकऱ्यांचे जीव धोक्यात येत आहेत. या महामार्गावर वेगमर्यादा नियंत्रण, पोलिसांची गस्त, वॉर्निंग साईन बोर्ड, तसेच वारकऱ्यांच्या दिंडीसाठी स्वतंत्र मार्ग याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावे. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.”

 

या आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून, शेकडो वाहने अडकली आहेत. पोलिस अधिकारी व स्थानिक प्रशासन आंदोलन स्थळी दाखल झाले असून ग्रामस्थांशी चर्चा सुरू आहे.

पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे कारण वेग व निष्काळजी वाहनचालक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या सुरक्षेचा व महामार्गावरील अपघातप्रवण भागांवरील उपाययोजनेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार  लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार 
पुणे: प्रतिनिधी  लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...
भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'
संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा
नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम
भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले

Advt