- राज्य
- रोहिणी खडसे यांची अमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी
रोहिणी खडसे यांची अमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी
पती प्रांजल खेवलकर यांच्यानंतर रोहिणी खडसे देखील अडचणीत
पुणे: प्रतिनिधी
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर आता त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यादेखील अडचणीत आल्या आहेत. अमली पदार्थ विरोधी विभागाच्या पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे. जबाब घेण्यासाठी अमली पदार्थ विरोधी विभागाच्या कार्यालयात बोलावून घेण्यात आले आहे.
खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव पार्टी करताना रंगेहात पकडले आहे. या पार्टीत सहभागी असलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेकडे पोलिसांना अमली पदार्थ देखील सापडले. त्यामुळे खेवलकर यांच्या अडचणीत वाढ झाली.
खेवलकर यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे अश्लील चित्रण आढळून आले. खेवलकर हे महिलांना लालूच दाखवून सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी पुण्यात तळ ठोकून पोलीस आयुक्तांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची देखील भेट घेतली. यादरम्यान त्यांनी आपल्या पतीच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला.