- राज्य
- 'हा व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडे कसा गेला?'
'हा व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडे कसा गेला?'
माणिकराव कोकाटे यांची न्यायालयाकडे सखोल चौकशीची मागणी
नाशिक: प्रतिनिधी
विधानसभेत ऑनलाइन रमी ची जाहिरात बंद करतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे कसा गेला, याची सखोल चौकशी करण्यात यावी, क्रीडा व युवा कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयात केली आहे.
माणिकराव कोकाटे यांच्यावर विधानसभेत ऑनलाइन रमी खेळत असल्याचा आरोप करून त्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी प्रसिद्ध केला होता. याप्रकरणी कोकाटे यांनी रोहित पवार यांना नोटीस बजावली होती. त्यात आठ दिवसात जाहीर माफी मागण्यास बजावण्यात आले. मटर रोहित पवार यांनी त्याला कोणतेही उत्तर दिले नाही.
त्यानंतर कोकाटे यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पवार यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला. त्याची सुनावणी आज झाली. कोकाटे यांनी स्वतः न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडले.
आपल्याला रमी खेळता येत नाही. मोबाईलवर आलेली जाहिरात डिलीट करण्यासाठी काही वेळ लागला. तेवढ्या वेळात व्हिडीओ काढला गेला. हे सर्व स्पष्टीकरण देऊनही व्हिडिओ व्हायरल होत राहिला. त्यामुळे व्यक्तिशः आपली, आपल्या पक्षाची आणि पक्षाच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली. आपल्याला कृषिमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले, असे कोकाटे यांनी न्यायालयात सांगितले.