- राज्य
- लाडक्या बहिणींना मिळू शकणार व्याजमुक्त कर्जाची सुविधा
लाडक्या बहिणींना मिळू शकणार व्याजमुक्त कर्जाची सुविधा
महिला व बालविकास विभाग आणि मुंबई बँकेचे विशेष योजना
मुंबई: प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये मानधन मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यासाठी राज्य शासनाचा महिला व बालविकास विभाग आणि मुंबई बँकेने विशेष योजना जाहीर केली आहे.
या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी लाभार्थी महिलांना दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार असून त्यासाठी कोणतीही व्याज आकारणी केली जाणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि त्याचे मानधन मुंबई बँकेतील खात्यामध्ये जमा होणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
लाभार्थी महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यक्तिगतरित्या कर्ज घेऊ शकतात किंवा दोन ते दहा महिलांचा समूह देखील एकत्र येऊन या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी कर्ज उभारणी करू शकतो. या कर्जाच्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या लाडकी बहीण योजनेतील मानधनाच्या रकमेतून जमा करून घेण्यात येणार आहे.