- राज्य
- महाराष्ट्र एटीएसकडून संशयित ताब्यात
महाराष्ट्र एटीएसकडून संशयित ताब्यात
दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय
On
ठाणे: प्रतिनिधी
पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंब्रा येथून इब्राहिम अबिदी या संशयितला ताब्यात घेतले आहे. त्याच्या घरातून लॅपटॉप, हार्ड डिस्क असे साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे.
इब्राहिम अबिदी हा शिक्षक असून दर शुक्रवारी कुर्ला येथील मशिदीत उर्दू शिकवण्यासाठी जात असतो. पुण्यातील कोंढवा येथून ताब्यात घेतलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून इब्राहिम याचे नाव पुढे आल्याने त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
इब्राहिम याची दुसरी पत्नी कुर्ला येथे राहत असून तिच्या घराची देखील पोलिसांनी झेडपी घेतली आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून पोलीस अधिक सतर्कतेने तपास करीत आहेत.
About The Author
Related Posts
Latest News
23 Nov 2025 15:03:18
पुणे: प्रतिनिधी
लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...

