- राज्य
- सोलापूरच्या धार्मिक स्थळांनी समाजासमोर घालून दिला आदर्श
सोलापूरच्या धार्मिक स्थळांनी समाजासमोर घालून दिला आदर्श
पोलीस आयुक्तांच्या पुढाकाराने बहुतेक धार्मिक स्थळांमध्ये भोंगे काढले
सोलापूर: प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या पुढाकाराला प्रतिसाद देऊन शहरातील बहुतेक धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आले. या कृतीने समाजासमोर आदर्श घालून दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या प्रार्थना स्थळावरील भोंगे काढण्याच्या आदेशाचे पालन व्हावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी मोर्चा आयोजित केला होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली.
त्यानंतर पोलीस आयुक्त एम रामकुमार यांनी पुढाकार घेऊन सर्व धर्मगुरूंची बैठक घेऊन त्यांना आवाहन केले. त्याला प्रतिसाद देऊन शहराचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर मंदिरासह एकूण 192 मशिदी आणि दर्गे, 79 मंदिरे, 10 चर्च आणि 8 बौद्ध विहार असे एकूण 289 प्रार्थना स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने प्रार्थना स्थळांच्या वर किंवा बाहेर भोंगे लावण्यास मनाई केली आहे. या पुढील काळात सर्व सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमात आवाजाच्या पातळीची मर्यादा राखली जाईल, अशी अपेक्षा पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे.