- राज्य
- 'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार'
'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार'
जनसुराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे यांनी दिली ग्वाही
सांगली: प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जनसुराज्य पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याची ग्वाही या पक्षाचे प्रमुख आमदार विनायक कोरे यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि रणनीती निश्चित करण्यासाठी मिरज येथे पक्षाच्या पदाधिकारी आणि जेष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच पार पडला. आमदार अशोक माने आणि प्रदेशाध्यक्ष समिती कदम यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने आणि पूर्ण शक्तीने काम करून आपले अधिकाधिक उमेदवार निवडून आणतील, असा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. ही निवडणूक जनसुराज्य पक्ष भारतीय जनता पक्षाशी समन्वयाने लढवेल, असेही मेळाव्यात स्पष्ट करण्यात आले. या मेळाव्याला कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे यासह अन्य जिल्ह्यातील जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.