- राज्य
- राज्याच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा
राज्याच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा
शक्ती चक्रीवादळाचा किनारपट्टीच्या भागात बसणार धक्का
पुणे: प्रतिनिधी
शक्ती या चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टीच्या भागात तीन ते सात ऑक्टोबर या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनांनी सतर्क राहण्याचे आदेश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत.
शक्ती या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून ताशी 45 ते 65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून जिल्हा प्रशासनांनी त्यासाठी सज्ज राहावे, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तीन ते पाच ऑक्टोबर या कालावधीत समुद्र अत्यंत खवळलेल्या अवस्थेत असणार आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे.