- राज्य
- बॉम्बच्या अफवेने रेल्वे प्रवाशांमध्ये घबराट
बॉम्बच्या अफवेने रेल्वे प्रवाशांमध्ये घबराट
भुसावळ जळगाव दरम्यान महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्बची अफवा
जळगाव: प्रतिनिधी
महानगरी एक्सप्रेसच्या शौचालयात बॉम्ब फुटणार असल्याचे लिहून ठेवल्यामुळे रेल्वेच्या सुरक्षा विभागाने बॉम्ब शोधक पथकासह संपूर्ण गाडीची कसून तपासणी केली. अखेर ही अफवा असल्याचे सिद्ध झाले. मात्र, या दरम्यान रेल्वे प्रवासी आणि प्रशासनामध्येही तणावाचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
एकीकडे दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर झालेल्या बॉम्बस्फोटामुळे केवळ राजधानीतच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ निर्माण झालेली असतानाच ही अफवा पसरवण्यात आली. गाडीतील शौचालयामध्ये पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय जिंदाबाद, बम फुटणे वाला है, असा मजकूर अज्ञात इसमाने क***** रंगाच्या खडू नये लिहून ठेवला होता. ही बाब प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्वरित रेल्वे पोलिसांना कळविण्यात आली.
रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा विभाग आणि बॉम्ब नाशक पथकाने संपूर्ण रेल्वेची कसून तपासणी केली. त्याचप्रमाणे काही प्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली. मात्र, त्या लिखित मजकुरात कोणतेच तथ्य नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर रेल्वे प्रशासनासह प्रवाशांनी सुटकेचा निशस सोडला.

