- राज्य
- संतप्त जमावाने तोडले न्यायालयाचे फाटक, सौम्य लाठीमार
संतप्त जमावाने तोडले न्यायालयाचे फाटक, सौम्य लाठीमार
चिमुरडी वरील अत्याचार आणि बळी प्रकरणी संतापाचा कडेलोट
नाशिक: प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या विजय खैरनार या नराधम आरोपीला न्यायालयात आणण्यात येत असल्याचे समजताच संतप्त नागरिकांचा जमाव न्यायालयाबाहेर जमला. त्यांनी न्यायालयाच्या आवाराचे फाटक तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला नियंत्रणाखाली आणले.
या प्रकरणातील आरोपीला यापूर्वी न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती. ती मुदत संपली असल्याने त्याला न्यायालयात आणण्यात येत असल्याचे समजल्यावर मोठा जमाव न्यायालयाच्या दिशेने आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वाढीव कुमक मागवून बंदोबस्त अधिक कडे कोट केला.
जमाव न्यायालयात घुसल्यास संभाव्य धोका ओळखून पोलिसांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले. संबंधित आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता दूरदृश्य प्रणाली द्वारे अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांच्या दक्षतेमुळे परिस्थिती वेळेत नियंत्रणात आली.
हे पण वाचा कराडमध्ये सत्तासंघर्ष शिगेला : महायुती फिस्कटली, भाजपला स्वबळावर विश्वास, विरोधकांनी मोट बांधली!डोंगराळे या गावात घडलेल्या या अमानुष घटनेबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आहे. विजय खैरनार या 24 वर्षीय आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी भावना लोकांच्या मनात आहे तर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्याला चकमकीत ठार करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत.
