- देश-विदेश
- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या बंद
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या बंद
धावपट्टीच्या दुरुस्ती, देखभालीसाठी प्रशासनाचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या दिनांक २० रोजी दुपारी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. धावपट्टीची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
उद्या ११ ते ५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून एकाही विमानाचे उड्डाण अथवा आगमन होणार नाही. दरवर्षी पावसाळ्यात धावपट्ट्यांची काही प्रमाणात हानी होत असते. त्यामुळे पावसाळ संपल्यावर त्यांची दुरुस्ती, देखभाल करावी लागते. त्यासाठीच उद्याचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वाधिक गजबजलेल्या विमानतळांपैकी आघाडीचे विमानतळ आहे. या विमानतळावरून रोज लाखो प्रवाशांची ये जा होत असते. या विमानतळावर दर चार मिनिटांनी एका विमानाचे आगमन अथवा उड्डाण होत असते. त्यामुळे या विमानतळावरील धावपट्ट्यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी अनेक महिने आधीपासून प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार विमान कंपन्यांना याबद्दलची योग्य वेळी कल्पना देण्यात आली आहे. विमान कंपन्यांनी उद्या ११ ते ५ या वेळेतील अनेक विमाने रद्द केली आहेत किंवा त्यांचे मार्ग बदलले आहे.

