जीएसटी सुधारांमुळे महागाईत घट, घरबांधणी निर्यात क्षेत्राला नवी दिशा

अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफकॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल यांचे प्रतिपादन

जीएसटी सुधारांमुळे महागाईत घट, घरबांधणी निर्यात क्षेत्राला नवी दिशा

नवी दिल्ली : प्रतिनिधी

कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एज्युकेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी अलीकडे जाहीर झालेल्या जीएसटी सुधारांचे स्वागत केले असून हे पाऊल केवळ उद्योग-व्यापार क्षेत्रासाठीच नव्हे तर सर्वसामान्य जनतेसाठीही मोठा दिलासा देणारे ठरणार असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, “सिमेंट व स्टीलवरील जीएसटी कमी करण्याची मागणी चेंबरकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. सरकारच्या या निर्णयामुळे घर बांधण्याचा खर्च कमी होईल आणि सामान्य माणसासाठी स्वतःचे घर उभारणे सुलभ होईल.”

अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, आरोग्यसेवा आणि विमा पॉलिसींवरील जीएसटी हटविणे हे समाजासाठी ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि समाजात सुरक्षिततेची भावना दृढ होईल.

हे पण वाचा  'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस'

निर्यात क्षेत्राविषयी बोलताना ते म्हणाले की, या सुधारांमुळे ऑटोमोबाईल निर्यातीला थेट फायदा होणार आहे. कर रचना साधी झाल्याने भारतीय ऑटोमोबाईल उद्योग जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक बनेल. यामुळे निर्यातीला चालना मिळेल आणि आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला बळकटी मिळेल.

भविष्यातील दिशेविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले –
“आमची ठाम मागणी आहे की, पुढील काळात फक्त दोन जीएसटी स्लॅब – ५% आणि १२% – ठेवले जावेत. यामुळे करव्यवस्था सोपी होईल, महागाईवर नियंत्रण मिळेल आणि उद्योग-व्यापाराला स्थैर्य प्राप्त होईल.”

या प्रसंगी संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी नरेंद्र गोयल, कमलराज बन्सल, विनोदराज संकला, उमेश मांडोत यांच्यासह इतर सदस्यांनीही जीएसटी सुधारांचे स्वागत केले असून हे पाऊल भारतीय उद्योग, व्यापार आणि समाज – या तिन्ही क्षेत्रांसाठी दूरगामी लाभदायक ठरेल असे मत व्यक्त केले.

About The Author

Advertisement

Latest News

Advt